Beed Teacher News: बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या, सुप्रिया सुळेंचा कुटुंबाला आधार, पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली

Dhananjay Nagargoje Family Support: बीडच्या आश्रम शाळेतील दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती. आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.
Supriya Sule news
Supriya Sule news Saam Tv
Published On

बीडच्या आश्रम शाळेतील दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी भावनिक फेसबुक पोस्ट करत आयुष्य संपवले होते. १८ वर्षे ना पगाराचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, तसेच संस्थाचालकांकडून होणारा त्रास वेगळा. याच कारणामुळे फेसबुक पोस्ट करत त्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. मन्न सुन्न करणाऱ्या या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.

केज तालुक्यातील केळगाव येथे एक आश्रम शाळा आहे. या शाळेत दिवंगत धनंजय नागरगोजे १८ वर्ष कार्यरत होते. मात्र, त्यांना १८ वर्षे पगार न मिळाल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचे ठरवले. अवघ्या तीन वर्षीय लेकीला पत्र लिहून माफी मागत त्यांनी आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी कुटूंबाला आधार देण्याचं ठरवलं.

Supriya Sule news
Weather Update: राज्यातील वातावरण बिघडलं! ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

नागरगोजे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुप्रिया सुळेंनी घेतली आहे. त्याच बरोबर नागरगोजे यांच्या पत्नी आणि दीराला रोजगार मिळावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

केळगाव येथील आश्रमशाळेत धनंजय नागरगोजे कार्यरत होते. वारंवार पगार मागूनही त्यांना पगार दिला जात नव्हता. उलट 'तू आत्महत्या कर' असा जीवघेणा सल्ला संस्थाचलकांनी दिला होता. असं नागरगोजे यांनी आपल्या लेकीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काही करू शकलो नाही, असं म्हणत त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

Supriya Sule news
Aurangzeb: औरंगजेबाच्या कबरीवर तुळस का असते?

नागरगोजेंच्या मुलांची जबाबदारी आता सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. तसेच मुलांच्या आईला आणि त्यांच्या दिराला नोकरी मिळावी यासाठी शासनदरबारी आपण पाठपुरावा करू, असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. याबरोबरच विनाअनुदानित आश्रम शाळांना टप्पा अनुदान मिळूनही, अद्याप शासनाकडून या शाळांना निधी मिळाला नाही, तो लवकरात लवकर मिळावा, यासाठीही पाठपुरावा करू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com