सत्ता बदल झाल्यापासून बीड मतदार संघावर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. यावरुनच बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये मोठी खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल (रविवार, ७ जानेवारी) बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी अन्यायाचा पाढाच वाचला..बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होत जाब विचारला.
राजकारण, राजकारणाच्या मैदानात, नागरी विकासाच्या दृष्टीने महत्वकांक्षी कामे अडवून जनतेवर अन्याय कशाला करता ? घोडामैदान याचवर्षी आहे, तिथे लढा! असे सांगत बीड मतदारसंघावर होनारा अन्याय सहन करणार नसल्याची भूमिका संदिप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी स्पष्ट केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितील जिल्हा नियोजन बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी तक्रारींचा पाढाचं वाचला. सातत्याने विकासकामांत खोडा आणि मिळालेला निधी परत पाठवणे, वळवणे, कामांना स्थगिती देणे असे प्रकार सुरू असल्याची तक्रार संदीप क्षीरसागर यांनी केली. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचेही पाहायला मिळाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.