Beed News: मराठी मुलाला गुजराती पेपर; शिक्षकांच्या निष्काळजीपणाचा विद्यार्थ्याला फटका

बीड येथील धक्कादायक प्रकार
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On

Beed News: बीड जिल्ह्यात नवोदय परीक्षेत शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला चक्क गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका आल्याने गोंधळ उडाला. तर त्या विद्यार्थ्यांला गुजराती येत नसतानाही तोच पेपर सोडवावा लागला आहे. (Latest Marathi News)

Beed News
Bhiwandi Building Collapse: धाय मोकलून रडला, हात जोडत आभार मानले! तरुणाची तब्बल २० तासांनंतर ढिगाऱ्याखालून सुटका

बीडच्या (Beed) शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोहा येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा नवोदय पात्रता परीक्षा फॉर्म भरताना शिक्षकाच्या चुकीने परीक्षेचे माध्यम मराठी ऐवजी गुजराती झालं. त्यावेळी कोणाच्याच लक्षात आले नाही.

मात्र ऐन परीक्षा (Exam) दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात गुजराती माध्यमाचा पेपर पडल्यानंतर, परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. मात्र चूक लक्षात आल्यानंतर सदरील विद्यार्थ्याला गुजराती मधूनच पेपर सोडावा लागला. शिक्षकांच्या चुकीमुळे विद्यार्थ्याला त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला. (Beed News)

Beed News
Mumbai Crime News: IT कंपनीसाठी भाड्याने घेतलेल्या १७५ लॅपटॉपचा अपहार करुन फरार; गुन्हा दाखल

दरम्यान यासंदर्भात मात्र शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना जाब विचारला असता, आता काहीच करता येत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असं उडवा उडवीचे उत्तर दिले.. त्यामूळे या शिक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com