Rain Update: बीड जिल्ह्यातील 58 गावांना पुराचा संभाव्य धोका; राक्षसभुवन येथील शनी मंदिर पुन्हा पाण्याखाली

बीड जिल्ह्यातील 58 गावांना पुराचा संभाव्य धोका; राक्षसभुवन येथील शनी मंदिर पुन्हा पाण्याखाली
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : पैठण येथील नाथसागर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे (Godavari River) गोदावरी नदीपात्रात 30 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला पुरस्थिती निर्माण झाली असून ५८ गावांना पुराचा धोका आहे. शिवाय देशातील साडेतीन (Beed News) शक्तीपीठापैकी एक असणारे गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनी मंदिर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. (Beed Rain Update)

Beed News
रक्षाबंधनाची शासकीय सुटी रद्द; पुरपरिस्थितीमुळे काढले आदेश

राज्‍यातील अनेक भागात पावसाची संततधार (Heavy Rain) सुरू आहे. बीड (Beed) जिल्‍ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू असून पावसामुळे पुरजन्‍य परिस्‍थीती निर्माण झाली आहे. दरम्‍यान नाथसागर धरणात सध्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने नदी पात्रातील पाणी मंदिराच्या गाभाऱ्यात आले असून शनीच्या मुर्त्या देखील पाण्याखाली आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी कोणीही जाऊ नये; असे आवाहन तहसीलदार सचीन खाडे यांनी केले आहे.

गावांना धोका

गोदावरी नदील मोठा पुर आल्‍याने बीडच्या गेवराई तालुक्यातील 32 आणि माजलगाव तालुक्यातील 26 गावांना संभाव्य पुराचा धोका आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी पात्रात कोणीही उतरू नये; असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com