Beed News Maratha Aarkshan
Beed News Maratha AarkshanSaam tv

Beed News : आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही; बीडमध्ये दोन दिवसापासून बेमुदत उपोषण

Beed News : आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही; बीडमध्ये दोन दिवसापासून बेमुदत उपोषण

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील काही महिन्यापासून जोरदार लढा सुरु आहे. या लढ्यात (Beed) बीडमधूनही आंदोलन छेडण्यात आले आहे. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं; या मागणीला पाठिंबा (Maratha Aarkshan) देण्यासाठी ओबीसी क्रांती परिषदेच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. (Tajya Batmya)

Beed News Maratha Aarkshan
Jalna News : अंबड शहरात ओबीसी समाजाचा महामोर्चा; मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध

मराठा आरक्षण मिळावे यासाठी अजूनही राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. दरम्यान बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. एकीकडे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये, अशी मागणी होत असताना दुसरीकडे बीडमध्ये मात्र ओबीसी क्रांती परिषदेने मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाला पाठिंबा दर्शवला असून यापूर्वी ७० टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये आलेला आहे. त्यामुळे इतर सर्वसामान्य आणि गरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये सहभागी करून घेण्यात आम्हाला कुठलीही अडचण नसल्याचे ओबीसी क्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News Maratha Aarkshan
Jalgaon News: उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या नावे फसवणूक; २०० महिलांकडून उकळले पैसे


दरम्यान मराठा समाजाला ओबीसीमध्ये सहभागी करून घेऊ नये; असं राजकीय नेते म्हणत असले तरी ते त्यांच्या स्वार्थासाठी बोलत आहेत. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाज हे कायम एकमेकांसोबत राहिले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळावा. अशी भावना ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com