Beed: थेट एसपींना हॅकरचे आव्हान; फेसबुक मेसेंजरमधून पैशाची मागणी

अज्ञात हॅकरवर आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता; सायबर विभाग प्रमुख रवींद्र गायकवाड यांची माहिती
Mumbai Cyber Crime
Mumbai Cyber CrimeSaam TV
Published On

बीड - आजपर्यंत आपण सर्वसामान्यांना सोशल मीडिया (Social Media) हॅकर आणि सायबर गुन्हेगारांनी गंडा घातल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. मात्र सोशल मीडिया हॅकरकडून बीडचे एसपी देखील सुटले नाहीत. हॅकरणे पोलीस (Police) अधीक्षक नंदकिशोर ठाकूर यांना आव्हान देत, त्यांचं वैयक्तिक फेसबुक अकाउंट हॅक करत, मेसेंजर मधून त्यांच्या मित्र यादीतील अनेकांना पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे फेसबुकवर वैयक्तिक अकाऊंट आहे. त्यांनी ते लॉक केलेले आहे. मात्र, मित्रयादीतील काही जणांना मेसेंजरमधून पैशांची मागणी झाली. त्यानंतर व्हॉटस्अपवर ठाकूर यांचा फोटो डीपीला ठेऊन व्हाऊचर पाठवून पैसे मागितले. सुरुवातीला काही जण गडबडून गेले.

हे देखील पाहा -

मात्र, मित्रयादीतील अधिकाऱ्यांनी अधीक्षक ठाकूर यांना संपर्क साधून याबाबतची माहिती कळविल्यावर, ठाकूर यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माझ्या फोटोचा वापर करुन कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये, दुर्लक्ष करावे, अशी सूचना केली आहे.

Mumbai Cyber Crime
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी जळगावात तणाव; धरणगावात बॅनर फाडले

दरम्यान, सायबर भामट्यांनी एसपींच्या फोटो आधारे तेच असल्याचे भासवून पैसे मागितल्याने सायबर विभागाने प्राथमिक तपास सुरु केला आहे. दरम्यान या प्रकरणात अज्ञात हॅकरवर, आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती, सायबर विभाग प्रमुख रवींद्र गायकवाड यांनी सांगितल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com