Beed Vidhan Sabha
Beed Vidhan SabhaSaam tv

Beed Vidhan Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकिटासाठी शब्द दिला मात्र पूर्ण केला नाही; अनिल जगताप यांनी व्यक्त केली नाराजी

Beed news : राज्याचे लक्ष लागलेल्या बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
Published on

बीड : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती नाराज होत बंडखोरीचे हत्यार उपसले असून आता ते थेट निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिकिटासाठी कमी पडले आहेत. त्यांनी पक्षप्रवेश करताना उमेदवारीचा शब्द दिला होता, मात्र शब्द पूर्ण झाला नाही, याचे परिणाम आता बीड जिल्ह्यातील ६ मतदारसंघात त्यांना पाहायला मिळणार आहेत.

राज्याचे लक्ष लागलेल्या (Beed) बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. याठिकाणी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे अनिल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी वाढली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त करत एकप्रकारे इशाराच दिला आहे.

Beed Vidhan Sabha
Devlali Vidhan Sabha : देवळाली मतदारसंघात महायुतीमध्ये वादाची ठिणगी; भूमिका स्पष्ट करण्याबाबत सरोज अहिरे यांची शिंदेंकडे विनंती

क्षीरसागर मुक्त बीड करण्याचा जगताप यांचा निर्धार 
बीड मतदारसंघावर क्षीरसागर कुटुंबाची घराणेशाही आहे. याचा माज क्षीरसागर कुटुंबाला असून क्षीरसागर मुक्तीचा नारा देत आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. गेल्या ५ नाहीतर १५ वर्षांमध्ये या बीड मतदार संघाचा विकास केला नाही. त्यामुळे आता जनता त्यांना धडा शिकवणार असून क्षीरसागर मुक्त बीड मतदार संघ होणारच, हाच आमचा निर्धार आहे; असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर जिल्हाप्रमुख तथा बीड विधानसभेचे अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Beed Vidhan Sabha
Erandol Vidhan Sabha : निवडणूक न लढविल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज; एरंडोल मतदारसंघातून ६० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामा

त्याचप्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद घेतला असून बीडमधील इच्छुक असणारे उमेदवार माझ्या पाठीमागे असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com