Parali Police : धर्मापुरीत १३ लाख रुपयांचा गुटखा पकडला; क्यू आर कोडवर आलेल्या माहितीवरून पोलिसांची कारवाई

Beed News : काही दिवसांपूर्वी बीड पोलीस दलाच्या वतीने संवाद प्रकल्प हाती घेण्यात आला. या अंतर्गत सर्वसामान्य नागरिक अवैध धंदे तसेच एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाला माहिती देऊ शकतात
Parali Police
Parali PoliceSaam tv
Published On

बीड : बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे परळी ग्रामीण पोलिसांनी तेरा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे पोलीस दलाला क्यू आर कोडद्वारे गुटखा वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धर्मापुरी येथे मोठी कारवाई केली आहे. 

काही दिवसांपूर्वी बीड पोलीस दलाच्या वतीने संवाद प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या अंतर्गत सर्वसामान्य नागरिक देखील अवैध धंदे तसेच एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाला माहिती देऊ शकतात. या ऑनलाइन तक्रारीचा किंवा कोड स्कॅन करून ही तक्रार तसेच माहिती देता येते. आलेल्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबतची याबाबतचा पाठपूरावा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून घेतला जातो; यावरूनच ही कारवाई करण्यात आली आहे. 

Parali Police
Valentine Day : व्हॅलेंटाईनला मावळच्या गुलाबाचा बहर; ८० लाख फुलांची परदेशात निर्यात; गुलाब निर्यातीत मावळ राज्यात प्रथम

१३ लाखांचा गुटखा जप्त 

बंदी असलेला गुटखा, तंबाखूची तस्करी आजही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कारवाई होत असताना देखील छुप्या पद्धतीने गुटखा वाहतूक व विक्री केली जात आहे. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यात गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल १३ लाख रुपयांचा गुटख्यासह पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

Parali Police
Sand Mafia : वाळू माफियांची पुन्हा मुजोरी; तहसीलदाराच्या वाहनावर केली दगडफेक

पोलिसात गुन्हा दाखल 
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा घटना घडत असताना आता पोलीस दलाकडून सुरू करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अवैध धंदे बंद करण्यात सर्वसामान्य नागरिकांची ही मदत होत असल्याचे दिसत आहे. याच संवाद प्रकल्प अंतर्गत धर्मापुरी येथे गुटख्याचा साठा असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com