Ahmednagar News: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती (Punyashlok Ahilyadevi Holkar) आहे. यानिमित्ताने त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) चौंडी (Chaundi) इथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सुरू असतानाच अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे..
धनगर समाजाचा मोर्चा...
याबाबत अधिक माहिती अशी की, आज राज्यभरात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे. याचदिवशी त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर (Ahilyadevi Nagar) करा, या मागणीसाठी बीडमध्ये (Beed) धनगर समाज आक्रमक झाला आहे. याच मागणीसाठी धनगर समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणबाजी करण्यात आली. या मोर्चामध्ये शेकडो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. "अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरचे नामांतर करून अहिल्यादेवीनगर अशी घोषणा करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करू," असा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साजरी होणार जयंती...
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या जन्मगावी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या जयंती सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia), इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.