बीड : संजय राऊत हे दोन तोंडी मांडूळासारखी भूमिका घेतात. बॅग तपासणीची मागणी संजय राऊत यांनीच लोकसभा निवडणुकीत केली होती आणि आता ते मांडूळासारखी भूमिका घेता येत आहेत. उद्धव ठाकरेंची बॅक तपासली म्हणून राग का? असं म्हणत भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर घनाघात केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅग तपासणी करण्यात आली होती. यावरून सध्या वादंग सुरु असून भाजप प्रवक्ते रॅम कुलकर्णी यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी राम कुलकर्णी म्हणाले, की बॅग तपासणीची मागणी संजय राऊत यांनीच निवडणूक आयोगाकडे लोकसभा निवडणुकीत केली होती. उद्धव ठाकरेची पर्स पोलिसांनी तपासली म्हणुन राग का? पोलिस त्यांची कर्तव्य पार पाडतांना त्यांना ठाकरेनी दमबाजी करणे योग्य नव्हे, असंही कुलकर्णी म्हणाले.
त्याचबरोबर नितिन गडकरी, देवेंन्द्र फडणविसांच्या बॅगा तपासणी झाली. राऊत म्हणतात विमानतळावर तपासणी झाली. मात्र आता बॅगा तपासणीच्या कारणावरून पोलीस यंत्रणेला उद्धव ठाकरेंनी दम देणे योग्य नसल्याचे देखील भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.