Beed News: राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल थरार! जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; बॉडीगार्ड जखमी

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रंगलेल्या या सिनेस्टाईल थराराने एकच खळबळ उडाली आहे.
Beed Collector Deepa Mudhol
Beed Collector Deepa MudholSaamtv
Published On

Beed Crime: बीड जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रंगलेल्या या सिनेस्टाईल थराराने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे.

Beed Collector Deepa Mudhol
Beed Crime: बीडच्या नेकनूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

वाळू माफियांची दादागिरी...

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडमध्ये (Beed) वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. छत्रपती संभाजी नगरहून बीडकडे येताना गेवराई जवळ वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या निदर्शनास आला. याच दरम्यान टिप्परवर कारवाई करण्यासाठी मुधोळ यांच्या गाडीने टिप्परला ओव्हरटेक केला.

बॉडीगार्ड जखमी...

यावेळी दीपा मुधोळ (Collector Deepa Mudhol) यांचे बॉडीगार्ड अंबादास तावणे यांनी टिप्पर चालकाला पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. तब्बल 3 किलोमीटर सिनेस्टाईल हा थरार धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळाला. सुदैवाने यात केवळ बॉडीगार्ड जखमी झाला. तर गाडी चालक आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या घटनेत बचावल्या आहेत. या प्रकारानंतर एलसीबीकडून टिप्पर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे.

Beed Collector Deepa Mudhol
Wardha News : वर्धेतील बॅंकेच्या १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांवर सायबर चाेरट्यांचा डल्ला

जिल्ह्यात खळबळ..

गेवराई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक वाळू उपसा होत आहे. यावर महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई केवळ तात्पुरत्या स्वरूपात असते. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यापासूनच वाळू माफीया त्यांच्या निशाणावर आहेत.

अशातच या घटनेमुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आता वाळू माफियांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच लक्ष केल्याने एकच खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com