Beed News : १४३ पैकी ९५ प्रकल्प ओव्हरफ्लो; बीडचा पाणी प्रश्न मिटला

Beed News : बीड जिल्ह्यातील लहान- मोठे असे १४३ प्रकल्प जोत्याखाली होते. त्यावेळी मोठ्या पावसाची अपेक्षा असताना रिमझिम पाऊस होत होता
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : दुष्काळी बीड जिल्ह्यावर यंदा पावसाने चांगली कृपा केल्याने शेतकऱ्यांसह नागरिक पाणी संकटातून बाहेर पडले आहेत. बीड जिल्ह्यातील लाभक्षेत्रात असलेल्या १४३ लहान- मोठ्या धरणांपैकी ९५ प्रकल्प पूर्णतः भरले असून उपयुक्त पाणीसाठा ७९.२१ टक्के झाला आहे. 

बीड (Beed News) जिल्ह्यातील लहान- मोठे असे १४३ प्रकल्प जोत्याखाली होते. त्यावेळी मोठ्या पावसाची अपेक्षा असताना रिमझिम पाऊस होत होता. मात्र काही दिवसांनी पावसाची गती वाढत गेली अन् सर्व धरणे मृतसाठ्यातून बाहेर आली. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणीसाठा वाढला. परिणामी परिसरातील पाणी पातळी वाढली आहे. यामुळे परिसरातील बोअर, विहिरींना पाणी आले आहे. त्यामुळे पाणी संकटातून जिल्हा आता बाहेर पडला आहे.

Beed News
Kalyan News : लोकल ट्रेनमध्ये सापडलेल्या २० लाख रकमेचा मालक आला समोर; पोलिसांनी मागविला तपशील

माजलगाव धरणातही ७० टक्के पाणीसाठा 

तसेच बीड शहराची तहान भागविणाऱ्या माजलगाव धरणात देखील ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील (Manjra Dam) मांजरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, लिंबोटी, काळवटी, नागपूर वान, चांदापूर हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने नागरिकासह प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com