बीडमध्ये अतिक्रमणची निर्दयी कारवाई! गरीब आजीची भाजी कचऱ्यात, डोळ्यातून अश्रूंचा पूर

Elderly Vegetable Vendor Harassment In Beed: अतिक्रमणावर कारवाई व्हायलाच हवी....मात्र त्याबाबत जेव्हा दुजाभाव केला जातो तेव्हा अनेकांचा संताप होतो. अशीच एक घटना बीडमध्ये घडलीय. ही घटना पाहिल्यानंतर तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही.
Elderly vegetable vendor breaks down after municipal officials dump her goods during an anti-encroachment drive in Beed.
Elderly vegetable vendor breaks down after municipal officials dump her goods during an anti-encroachment drive in Beed.saam tv
Published On

विशाल सवने, साम टीव्ही

इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी परिस्थितीशी झगडणारी ही बीडची आजी... आयुष्याच्या संध्याकाळी चार पैसं गाठीशी असावं म्हणून भाजी इकनारी ही आजी... हिच्या डोळ्यात आज पाणी हाय...डोळ्यात पाणी येण्यामागचं कारण हाय इथली गेंड्याची कातडी असणारी व्यवस्था... जिला ना दया अन् ना माया...

रणरणत्या उन्हात ही आजी बीडच्या भाजी मंडईत भाजी इकती. चार पैसं कमवती. पण बीडच्या नगर परिषदेच्या डोळ्यात ही खूपलं अन् आणली कारवाईची गाडी... गाडी आली पाच गडी गाडीतनं उतरलं अन् कारवाईला सुरुवात केली... अजीला हसकं दिलं धसकं दिलं... आजीनं इकायला आणलेली भाजी कनाकन उचलली... अन् कचऱ्याच्या गाडीत टाकली...

या कर्मचाऱ्यांचा निर्दयी पण इतका की सकाळपासनं उपाशी असलेल्या आजीचा जेवणाचा डबाबी... कचऱ्याच्या गाडीत फेकून दिला... सकाळपासनं कमावलेलं पैसंबी... कचऱ्यात टाकून दिलं... कर्मचारी हातात घावलं ती सामान उचलून फेकून देत हुतं... अन् आजी काडी काडी भाजी पदराखाली झाकून ठेवतं हुती... पण कर्मचाऱ्यांनी सगळं कचऱ्यात फेकून दिलं... डोळ्या देखत सगळ कचऱ्यात जाताना बघून आजी बांध पुढला अन् अजी ढसाढसा रडू लागली...

वाईट लय वाईट... ही व्यवस्था लय वाईट...

मोठ्या... लहान शिटीत करोडोचा भ्रष्टाचार हुतू... अनाधिकृत बांधकामाचं मजलं चढलं जात्यात... खोऱ्यानं पैसा वडून घेतला जातू...यांच्यावर कारवाई कधी होत नाय पण कारवाई हुती इतभर पोटाची खळगी भरणाऱ्या गरीब आजीवर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com