

महाराष्ट्राचा बिहार मानल्या जाणाऱ्या बीडमध्ये राजकीय गुंडगिरीला ऊत आला आहे. धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा कार्यकर्ता सुशील सोळंकेचा कारनामा समोर आलाय....सुशील सोळंकेने मल्टि सर्व्हिसेस चालकाला मारहाण केलीय.. एवढंच नाही तर सुशील सोळंकेने थेट तहसिलदार आणि पोलिसांनाही शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय..
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार प्रकाश सोळंकेंनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं. सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा चव्हाट्यावर आला.. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला.. तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या दहशतीचे आणि अमानुष मारहाणीचे व्हिडीओ समोर आले.
हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही तर मुंडेंचे विरोधक असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएने शोरुम मॅनेजरला मारहाण केल्याचं समोर आलं. सर्वसामान्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अमानुष मारहाण करणं, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमक्या देणं, शिवीगाळ करण्याचे प्रकार बीडमध्ये सर्रास सुरु आहेत..
मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा माज कुठून येतो? अशा मुजोर कार्यकर्त्यांची फौज पोसणारे आका कोण? पोलीस नेत्यांच्या मुजोर बगलबच्च्यांना पोलीसी खाक्या का दाखवत नाहीत? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.. त्यामुळे बीडमधील राजकीय गुंडागर्दी कधी उखडून फेकली जाणार आणि मुजोर कार्यकर्त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.