Beed : धनंजय मुंडे-वाल्मीक कराड सोबत गुन्हेगारी करायचे? २००७ मधील FIR व्हायरल

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे सोबत गुन्हेगारी करायचे? बीडमध्ये 2007 सालाचा एक FIR सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.
Dhananjay Munde
Dhananjay Munde
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही प्रतिनिधी

Beed Latest News : माजी मंत्री धनंजय मुंडे आणि अटकेत असलेला वाल्मीक कराड एकत्र गुन्हेगारी करायचे का? असा सवाल राज्यात विचारला जातोय. कारण, २००७ मधील एक एफआयआर कॉपी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीप्रकरणात वाल्मीक कराड सध्या अटकेत आहेत. वाल्मीक कराड यांच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला.

वाल्मीक करडा आपला खास माणूस असल्याचं धनंजय मुंडे यांनी भर कार्यक्रमात सांगितले होते. वाल्मीक कराड यांच्यावर धनंजय मुंडे यांना अनेकदा टार्गेट करण्यात आले होते. पण आता २००७ मधील एक एफआयआर बीडमध्ये व्हायरल होत आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या नावाचा समावेश आहे. सोशल मिडियावर वाऱ्याच्या वेगाने हा एफआयआर व्हायरल होतोय. किशोर फड यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धनंजय मुंड आणि वाल्मीक कराड यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. हा एफआयआर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dhananjay Munde
Beed : खोक्या भाईच्या घरी वन अधिकाऱ्यांची धाड, प्राण्याच्या मांसासोबत गांजा मिळाला

बीड जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर १८ एप्रिल २००७ रोजीचा FIR व्हायरल झाला आहे. या व्हायरल होत असलेल्या FIR सोबत एक मॅसेज देखील व्हायरल होतोय. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं म्हटलं जातेय. 2007 मध्ये किशोर फड याला जिवे मारण्याच्या आणि गाडी जाळल्याच्या प्रकरणात दोघे आरोपी आहेत, असंही नमूद करण्यात आलेलं आहे.

तर माझा आणि वाल्मीक कराडचा संबंध नाही असे धनंजय मुंडे म्हणाले होते. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा हा पुरावा आहे, असा मेसेज व्हायरल होत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड सोबत गुन्हे करायचे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Dhananjay Munde
Satish Bhosale : निर्दयी खोक्या भोसलेचा आणखी कारनामा, २०० काळवीट, शेकडो हरणं अन् ससे आणि मोरांचा घेतलाय जीव

बीडमध्य एकीकडे हा एफआयआर आणि मॅसेज व्हायरल होतोय तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी केलं जातं का? याची बीडमध्ये चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com