उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमधील धक्कादायक घटना

Beed Latest Crime News: गेवराई उपसरपंच गोविंद बरगे यांचा मृतदेह कारमध्ये सापडला. डोक्याला गोळी लागली असून, कारमध्ये पिस्तूल सापडलं.
Beed Latest Crime News
Beed Latest Crime NewsSaam
Published On
Summary
  • गेवराई उपसरपंच गोविंद बरगे यांचा मृतदेह कारमध्ये सापडला.

  • डोक्याला गोळी लागली असून, कारमध्ये पिस्तूल सापडलं.

  • आत्महत्या की हत्या यावर संशय निर्माण झाला आहे.

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच गेवराईमधील एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लुखामसला येथील उपसरपंच यांची हत्या करण्यात आली आहे. गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्या आहे की हत्या? याचे कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

गोविंद जगन्नाथ बरगे (वय वर्ष ३८) (गेवराई, लुखामसला गाव) असे मृत उपसरपंच यांचे नाव आहे. सोमवारी बरगे खासगी कामानिमित्त सोलापुरातील बार्शीमध्ये गेले होते. याठिकाणी ते चारचाकी वाहनाने गेले होते. मात्र, मंगळवारी सकाळी सासुरे गावातील शिवारात कारमध्येच त्यांचा मृतदेह आढळला. यामुळे गावात काहीवेळ खळबळ उडाली.

Beed Latest Crime News
तरूणाच्या मोबाईलमध्ये २० अश्लील क्लिप्स अन् तरूणींच्या विक्रीचे ऑडिओ; विद्यार्थिनीच्या धाडसामुळे पितळ उघड

या घटनेची माहिती तातडीने स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

Beed Latest Crime News
वरळी सी लिंकवर थरारक अपघात! चारचाकीने पोलीस हवालदाराला चिरडलं, जागीच मृत्यू

दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता गोविंद बरगे यांच्या डोक्याला गोळी लागली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची कार तपासली असता, त्यांच्या कारमध्ये पिस्तूल निदर्शनास आली. बरगे यांनी आत्महत्या केली? की त्यांची हत्या करण्यात आली आहे का? याचे कारण अस्पष्ट असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे बरगे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Beed Latest Crime News
शेतकऱ्यांना दिलासा, वीज दरात सवलत; फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com