Beed : छेडछाडीला कंटाळली, मामाच्या घरातच तरूणीने आयुष्य संपवले, आरोपीला तात्काळ बेड्या, पण....
Beed Crime News : छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडमध्ये तरूणीने टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक म्हणजे, तरूणीने मामाच्या घरात गळफास घेत आयुष्याचा दोर कापला. त्या मुलीचं २० एप्रिल रोजी लग्न होते, पण त्याआधीच तरूणीने टोकाचे पाऊल उचलले. मुलीने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केलाय.
मागील काही दिवसांपासून बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललाय. दररोज नवनव्या घटना, प्रकरणे समोर येत आहेत. लग्नाच्या आधीच तरूणीने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. मामाच्या घरात गळफास घेत तरूणीने टोकाचे पाऊल उचलले. छेडछाड आणि ब्लेकमेलला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुलगी गेल्यामुळे कांबळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी अभिषेक कदम याला पोलिसांनी अटक केली होती. पण पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतरही अभिषेक कदम याला लगेच जामीन मिळाला. आरोपीला तात्काळ जामीन मिळाल्यामुळे बीडमध्ये संतापाची लाट आहे.
पीडित मुलीच्या आईची प्रतिक्रिया -
२० एप्रिल रोजी मुलीचे लग्न होतं, पण त्याआधीच छेडछाडीला कंटाळून मुलीने आयुष्य संपवले. मुलीने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. पीडित मुलीच्या आईने यावरून संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक कदम आणि १०-१२ मुलांची एक टोळी आहे. ही टोळी मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढतात अन् ब्लॅकमेल करतात. हे एक प्रकारे रॅकेट आहे. यामध्ये दोन मुलींचाही आहे. अभिषेक कदम याच्यावर मकोका लावावा अन् कायमचा जेलमध्ये टाकावा, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली.
अंबादास दानवे काय म्हणाले?
राजकीय दबावाला पोलिसांनी बळी पडू नये. बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये. पोलिसांनी कडक कारवाई करावी. मुलींची छेडछाड असेल तर पोलिासांनी कठोर कारवाई करावी, असे अंबादास दानवे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.