Beed News: दुसऱ्या लग्नाचे आमिष, महिलेची फसवणूक करत मुलाची विक्री; धक्कादायक घटनेने बीडमध्ये खळबळ!

Beed Majalgaon News: या प्रकरणी सहा जणांविरोधात बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Bhiwandi Crime News
Bhiwandi Crime NewsSaam tv

Beed Crime News:

पतीपासून विभक्त महिलेला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तिच्या एका वर्षाच्या मुलाला ५० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी सहा जणांविरोधात बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Bhiwandi Crime News
Nashik News: अगोदर कृष्णाचे दर्शन घेत चोरला चांदीचा मुकुट; चोरता पोलिसांच्या ताब्यात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोमल श्रीराम चव्हाण ही बीडच्या (Beed) माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील गोवर्धन गावातील रहिवासी आहे. या २० वर्षीय महिलेचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र सध्या पतीसोबत विभक्त झाल्याने ती आपल्या आईवडिलांसोबत राहते. तसेच या महिलेला एका वर्षाचा मुलगाही आहे.

या महिलेच्या मामाने तिची ओळख शाहुनगर येथील छाया श्रीराम देशमुख या महिलेशी करुन दिली होती. १८ सप्टेंबर रोजी ही महिला छाया देशमुखच्या घरी आली असता त्या ठिकाणी तिची किशोर वासुदेव भोजणे रा. जिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा या तरुणाशी ओळख झाली. हा तरुण आपला मावसभाऊ असल्याचे छाया देशमुखने तिला सांगितले. या दोघांनी महिलेला दुसरे लग्न करण्याचा सल्ला देत वर शोधून देण्याची तयारी दर्शवली.

तसेच तुझ्या मुलाची सोय लावू असेही तिला सांगण्यात आले. यानंतर आणखी दोघांच्या मदतीने तिला घेवून हे सर्वजण कर्नाटकातील हुबळीला गेले. याठिकाणी त्यांनी पिडीत महिलेचा विरोध झुगारुन 1 वर्षीय मुलाची ५० हजारात विक्री केली. मुलाची विक्री करुन ते सर्वजण गोव्याला गेले. गोव्याहून परत येताना बसमध्ये बसलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला या सर्वांवर संशय आला.

त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती देत बसस्थानकात सर्वांना पकडून दिले. ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झाले. या प्रकरणात छाया व किशोर यांना न्यायालयाने 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

Bhiwandi Crime News
MNS Andolan : नवरात्रोत्सवापूर्वी कामगारांना पगार द्या, केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबत मनसे आक्रमक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com