Beed Breaking News : पंढरपूरहून बीडकडे येणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा भीषण अपघात; वाहनात होते २५ वारकरी

Beed Accident News : पंढरपूरहून बीड जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दहिगावला येताना वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ वारकरी जखमी झाले असून ३ महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत.
Beed Breaking News
Beed Breaking NewsSaam Digital
Published On

पंढरपूरहून बीडकडे परतीच्या प्रवासाला असणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 25 वारकरी जखमी झाले असून ३ महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पिकअपचे टायर फुटल्याने अपघात झाला आहे. वारकरी कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी आहेत.

Beed Breaking News
Gadchiroli: गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यात मोठी चकमक; १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेला होते. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते आज रात्री टेम्पोने बीडच्या दिशेने निघाले होते. दरम्यान बीडनजीक पोहचात त्यांच्या वाहनाचा अपघात भीषण अपघात झाला.

या अपघातात जवळपास 25 वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी ३ महिला वारकरी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पिकअपचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Beed Breaking News
IAS Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांवर आहे विनयभंगाचा गुन्हा; भालगाव ग्रामस्थांनी का दिला आंदोलनाचा इशारा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com