Ayodhya Temple : "हमारी साथ दे, मुंह खोल पैसा चाहिये" अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचा कट, बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून धमकीचा मेसेज

Beed News : बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील तरुणाला पाकिस्तानातून अयोध्येतील श्रीराम मंदिरावर आरडीएक्सने हल्ला करण्याचा मेसेज आला. या संदर्भात पोलिसांकडून सायबर तपास सुरू असून, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Ayodhya Temple News
Ayodhya TempleSaam Tv
Published On
Summary
  • शिरूर कासार येथील तरुणाला अयोध्येतील मंदिरावर हल्ल्याचा मेसेज

  • पाकिस्तानातून आलेल्या युजरने RDX व 1 लाखाच्या ऑफरसह कटात सामील होण्याची मागणी

  • पोलिसांकडून सायबर तपास आणि राष्ट्रीय यंत्रणांना माहिती देण्यात आली

  • धार्मिक स्थळाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; देशभरात चिंता

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील एका तरुणाला सोशल मीडियावरून एक धक्कादायक मेसेज मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या कराची येथील असल्याचा दावा करणाऱ्या एका संशयित युजरने अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवण्याच्या कटात सहभागी होण्याचे आमिष या तरुणाला दाखवले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात तरुणाला पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये स्पष्ट शब्दांत मंदिरावर हल्ल्याची योजना आखल्याचे नमूद करण्यात आले आहे. "हमारी साथ दे, मुंह खोल पैसा चाहिये. अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उड़ाना है" असा मजकूर असलेल्या व्हॉइस मेसेजमध्ये संशयित व्यक्तीने या कटात ५० जणांची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. प्रत्येकास १ लाख रुपये देण्याची ऑफर दिली असून, आरडीएक्स पोहोचवले जाईल असेही सांगण्यात आले आहे.

Ayodhya Temple News
Beed : कृष्णा आंधळेचा खून, वाल्मिक कराडने २५ जणांची हत्या केली, माझ्याकडे पुरावे; बडतर्फ पीएसआयचा खळबळजनक दावा

विशेष म्हणजे, संशयिताने स्वतःचे कराचीमधील लोकेशन स्क्रीनशॉटच्या स्वरूपात पाठवून आपली ओळख खऱ्या पाकिस्तानी नागरिक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या संवादात जर संबधित तरुणाला ही योजना मंजूर नसेल तर त्याने दुसऱ्या व्यक्तीचा नंबर द्यावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युजर खरोखर पाकिस्तानचा आहे का, याचा तपास सुरू आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने IP अ‍ॅड्रेस आणि लोकेशन ट्रेस करण्याचे काम सुरू असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Ayodhya Temple News
Cyber Crime News : टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना

संपूर्ण देशात सध्या उच्च सुरक्षा यंत्रणा सतर्क असतानाच असा प्रकार समोर येणं चिंतेची बाब आहे. धार्मिकस्थळाच्या सुरक्षेबाबत यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून, या कटाचा सूत्रधार आणि त्यामागील यंत्रणा लवकरच उघडकीस येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तरुणाने योग्य वेळी पोलिसांपर्यंत पोहचवलेली माहिती हा तपासातील महत्त्वाचा दुवा ठरतो आहे.

Q

बीड जिल्ह्यातील तरुणाला नेमका कोणता मेसेज मिळाला?

A

त्याला सोशल मीडियावरून अयोध्येतील श्रीराम मंदिरावर आरडीएक्सने हल्ला करण्याची ऑफर मिळाली होती.

Q

मेसेज पाठवणारा कोण आहे?

A

मेसेज पाकिस्तानच्या कराची येथून आलेला असून, त्या युजरने स्वतःचे लोकेशन आणि ऑडिओ मेसेज पाठवून आपली ओळख सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

Q

पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

A

शिरूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सायबर सेल आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्यासह तपास सुरू केला आहे.

Q

या प्रकाराचा उद्देश काय होता?

A

श्रीराम मंदिरावर मोठ्या प्रमाणात हल्ला घडवून आणण्याचा कट आखण्यात आला होता, ज्यामध्ये ५० लोकांची गरज असल्याचं सांगितलं गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com