विनोद जिरे
बीड: बीडच्या परळीमध्ये (Parali) पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) घराच्या शेजारी, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, तुफान राडा झालाय. या वेळी दोन तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी जुंपली होती. दरम्यान या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
परळीच्या शासकीय आयटीआय महाविद्यालयामध्ये, जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरून विध्यार्थी तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी येत असतात. याच कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांमध्ये भांडणे झाली. बघता बघता भांडणे एवढी टोकाला गेली की चक्क एका मुलाला अनेक मुलांनी मिळून काट्या व बेल्टने तुफान मारहाण केली. विशेष म्हणजे ही घटना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर घडलीय. यावेळी कॉलेजमधील अनेक विद्यार्थी या हाणामारीचा आनंद घेतांना दिसून आले.
हे देखील पहा-
दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला असून मारणारे नेमके कोण होते ? कोणाला मारलं ? हे अद्याप समजलं नाही. मात्र खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घराशेजारीच गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याने, मुलाला मारहाण केल्यानं पुन्हा एकदा जिल्ह्यात, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.