बीडच्या आशा सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा,तर एक दिवस पुकारला संप

बीडच्या अंबाजोगाईत आशा सेविकांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत एक दिवसाचा पुकारला संप पुकारला आहे.
बीडच्या आशा सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा,तर एक दिवस पुकारला संप
बीडच्या आशा सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा,तर एक दिवस पुकारला संपविनोद जिरे

बीड: बीडच्या अंबाजोगाईत आशा सेविकांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत एक दिवसाचा पुकारला संप पुकारला आहे. आशा सेविकांसह गट प्रर्वतक कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी, एकदिवशी संप पुकारला असून अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. (Beed Asha Sevika called march and one day a strike for various demands)

हे देखील पहा -

सीटू संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर एक दिवसाचा संप पुकारला आहे. हा संप आशा व गट प्रर्वतक यांच्या प्रलंबित मागण्यासाठी पुकारण्यात आला आहे. यामधे राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा,आशा सेविकांना आरोग्य सेवेत कायम कर्मचारी म्हणून सेवेत घ्या, 45 व्या श्रम परिषदेने सुचवलेल्या शिफारसी लागु करा, आशा गट प्रर्वतक यांची वेतनावर नियुक्ती करा, आशा गट प्रर्वतकांचे थकीत असलेल 2 हजार व 3 हजार रुपये त्वरीत वाटप करा यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.

बीडच्या आशा सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा,तर एक दिवस पुकारला संप
रायगड जिल्ह्यात साखर चौथीच्या गणपतीचे आगमन

दरम्यान यावेळी अंबाजोगाई शहरातून मोर्चा काढत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com