भाऊबीजेसाठी आलेल्या बहिणीला सोडवायला जातांना काळाचा घाला; भीषण अपघातात दोघे जागीच ठार

बीडच्या साळेगावजवळ कार- दुचाकीचा भीषण अपघात.
भाऊबीजेसाठी आलेल्या बहिणीला सोडवायला जातांना काळाचा घाला; भीषण अपघातात दोघे जागीच ठार
भाऊबीजेसाठी आलेल्या बहिणीला सोडवायला जातांना काळाचा घाला; भीषण अपघातात दोघे जागीच ठारविनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीडच्या केज - कळंब महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कळंब महामार्गावर आज सकाळच्या दरम्यान घडली आहे.

हे देखील पहा-

तर या अपघातामध्ये बहिणीला दुचाकीवर माहेरी सोडायला जाणाऱ्या, अमोल सत्वधर आणि कारमधील अमित जीवन बाराते (वय 22 रा. कळंब) हे दोघे जागीच ठार झाले आहेत. तर दुचाकीवरील अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा चि. आदित्य विनोद फुलसुंदर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान बस बंद असल्याने बहिणीला दुचाकीवर सोडवायला जातांना भावावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com