अबब! चक्क घरात दडून बसला अस्वल...

तब्बल ४ तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन अंतर्गत अस्वलाला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात यश
अबब! चक्क घरात दडून बसला अस्वल...
अबब! चक्क घरात दडून बसला अस्वल...अभिजीत घोरमारे
Published On

अभिजीत घोरमारे

भंडारा - घरात दडून बसलेल्या अस्वलाची Bear सुटका करत त्याला वन विभागाद्वारे जंगलाच्या दिशेने पळवून लावल्याची घटना भंडारा तालुक्याच्या धारगाव येथे घडली आहे. तब्बल ४ तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन Rescue Operation अंतर्गत अस्वलाला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात यश मिळाले आहे.

हे देखील पहा -

राज्यातील राजकारणातील भीष्माचार्य हरपले - एकनाथ शिंदेधरणगाव येथील श्रीराम नांदेश्वर याच्या पडक्या घरात अस्वल असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती भंडारा वनविभागाला दिली. वनविभागाचे पथक पोहचताच घराच्या चारही बाजू नेट लावून एका अरूंद जागेत पिंजरा लावण्यात आला. बाजूने नेट सैल ठेवण्यात  आले होते.

अबब! चक्क घरात दडून बसला अस्वल...
राज्यातील राजकारणातील भीष्माचार्य हरपले - एकनाथ शिंदे

अखेर अस्वलाला घरातुन हुसकावून लावल्यावर तो सरळ जंगलाच्या दिशेने पळाला. 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात यश मिळाले.यावेळी हा सर्व थरार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com