राज्यातील राजकारणातील भीष्माचार्य हरपले - एकनाथ शिंदे

मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे.
राज्यातील राजकारणातील भीष्माचार्य हरपले - एकनाथ शिंदे
राज्यातील राजकारणातील भीष्माचार्य हरपले - एकनाथ शिंदेSaam Tv
Published On

ठाणे - शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख Ganpatrao Deshmukh यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९५वर्षांचे होते. गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया देखील पार पडली होती.आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

शेतकरी कामागार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून तब्बल ११ वेळा गणपतराव देशमुखांची कारकिर्द राहील आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचे विद्यापीठ म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणून त्यांना ओळखण्यात आलं. आदर्श लोकप्रतिनिधी, आदर्श नेते तसेच त्यांनी आयुष्यभर गोर गरिबांच्या कल्याणार्थ गणपत आबांनी कार्य केले. सभागृहामध्ये त्यांचे भाषण सुरु झालं की, त्यांना ऐकण्यासाठी सभागृहातील आमदार त्यांना आतुर असत.

राज्यातील राजकारणातील भीष्माचार्य हरपले - एकनाथ शिंदे
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन!

त्यांच्या भाषणातून आमदारांना बहुमोल मार्गदर्शन प्रत्येक वेळी मिळत गेलं. राजकाराणाच्या क्षितिजापलिकडचे नेते अशीही त्यांची ख्याती सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. मितभाषी नेते, मंजूष स्वभावाचे नेते त्याचबरोबर त्यांनी आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत दुष्काळी भागासाठी कार्य करत राहिले. त्यांच्या जाण्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं न भरुन निघणारं येणारं नुकसान झालं आहे.  मी माझ्या वतीने आणि शिवसेना प्रमुखांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com