Maharashtra Politics: मविआच्या १००० बाबी आमच्याकडे आहे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

Chandrashekhar Bawankule: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज नांदेड दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले.
Chandrashekhar Bawankule on mva
Chandrashekhar Bawankule on mvasaam tv
Published On

नांदेड: मंत्री मुंडे आणि कोकाटे यांच रक्षण करणे हीच भाजपची हिंदुत्वाची व्याख्या आहे का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी केला होता. त्यावरच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरे हे आरोप करत राहतात. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या 1000 बाबी आमच्याकडे आहेत.

Chandrashekhar Bawankule on mva
Hit And Run : तरुणाला जोरदार धडक देत फरफटत नेले, कारचालक फरार

आता आरोप-प्रत्यारोपांचे दिवस नाहीत. जनतेने आमच्या सरकारला बहुमत दिले असून 52 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. आमचा भर वचनपूर्तीकडे आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत आहोत असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

Chandrashekhar Bawankule on mva
Maharashtra Politics : संजय राऊतांनी कुंभात स्नान केल्यास गंगा मैली होईल; शिंदे गटाचा तिखट वार

नांदेड-लातूरला महसूल कार्यालय होईल,

विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे आहे. मात्र मराठवाड्यातील नांदेड-लातूर हा भागही महत्त्वाचा आहे. त्यामुळे न्याय देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचे विभाजन करणे गरजेचे आहे. लातूर व नांदेडच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री यासंदर्भात बैठक घेतील व लवकरच निर्णय होईल, असे बावनकुळे म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजून काही त्यांच्या मागण्या असतील ते देखील पूर्ण करू अशी ग्वाही बावनकुळे यांनी देशमुख कुटुंबीयांना दिली. ज्या काही चौकशा अपेक्षित आहेत त्या सर्व चौकशा या सरकारने सुरू केले आहेत, मला विश्वास आहे संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेले आरोपी कुठलाही परिस्थितीत सुटला जाणार नाही. शेवटपर्यंत मागे लागणार आहे. कुठलाही पुरावा नष्ट होणार नाही.आमचा फोकस हे आहे की कुठलाही मारेकरी सुटू नये, फाशी होई पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com