Sanjay Raut News: सरकारला एकनाथ शिंदेंचे राजकीय प्राण वाचवायचे; खासदार संजय राऊत यांचा आरोप

Baramati News : सरकारला एकनाथ शिंदेंचे राजकीय प्राण वाचवायचे; खासदार संजय राऊत यांचा आरोप
Sanjay Raut
Sanjay RautSaam tv
Published On

बारामती : सरकार निर्दयी असून राज्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होत आहेत. तरीही सरकार मठासारखं बसून आहे. फक्त (Baramati) मुलाखती देत आहे. त्यांना सरकारचे प्राण वाचवायचे आहेत व एकनाथ शिंदे यांचे राजकीय प्राण वाचवायचे आहेत. यासाठी त्यांच्याकडे तडजोडीचे मार्ग आहेत. पण जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आंदोलकांसाठी मायेचा ओलावा दिसत नाही; अशा शब्दात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Maharashtra News)

Sanjay Raut
Maratha Reservation : विद्यार्थ्यांनी टाकला परिक्षांवर बहिष्कार, ९ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; मराठा आंदोलक आक्रमक

बारामती येथे आले असता खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाला पूर्णविराम मिळाला पाहिजे. त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. उद्धव ठाकरे मुंबईत बसून अनेकांशी चर्चा करत आहेत. यातून मार्ग निघावा हे राजकारण जे आहे. ते टोकाला जाऊ नये की ते परत मागे फिरायचे सर्व रस्ते बंद होऊ नयेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut
Jalna News : जालना तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक; मराठा आंदोलक आक्रमक

आम्ही सहकार्य करायला तयार 

जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आंदोलकांसाठी मायेचा ओलावा दिसत नाही मराठा समाज रस्त्यावरती (Maratha Reservation) उतरला असून या समाजाचा नेते जीवाची परवा न करता उपोषणाला बसले आहेत  त्यांचे प्राण वाचवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. सरकारला जर त्याच्यासाठी विरोधी पक्षाकडून काही सहकार्य हवे असेल, तर ते आम्ही द्यायला तयार आहोत, असेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com