प्रमोद जगताप
New Delhi: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची 110 वी जयंती, बाबा लाखीशाह बंजारा यांची 444 वी जयंती आणि रामराव महाराज यांची 88 वी जयंती संयुक्तरित्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. या जयंतीसाठी देशभरातून अनेक बंजारा समाजाचे नेते, शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी समाजाच्या अनेक प्रश्नांवर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. तसेच माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
वसंतराव नाईक हे प्रख्यात कृषीतज्ज्ञ, प्रगतीशील शेतकरी आणि राजकारणी होते. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ होते. हरितक्रांतीचे जनक म्हणून कीर्ती असलेल्या वसंतराव नाईक यांची महाराष्ट्र सदनात जयंती साजरी झाली. या जंयतीला अनेक बंजारा समाजाचे नेते उपस्थित होते.
या जयंतीनंतर माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले, 'भारतातील अनेक लोक या कार्यक्रमाला आले. आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान मोदींकडे घेऊन गेलं पाहिजे. यावेळी त्यांनी बंजारा समाजाला विशेष आरक्षणची मागणी केली. तसेच त्यांनी वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली.
तर आमदार राजेश राठोड म्हणाले, 'पाहिल्यानंदा राष्ट्रीय स्तरावर जयंती साजरी केली गेली. राष्ट्रीय बंजारा परिषदेचं आयोजन करण्यात आलं. संपूर्ण भारतात एकच भाषा, बोली या समाजाची आहे'.
'वन नेशन वन कॅटेगिरीत 'एसटी ब' या कॅटेगिरीत बंजारा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी पंतप्रधान मोदींकडे करत आहोत. बंजारा समाजाच्या मागणीकडे सरकारने लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
'त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर लाँग मार्च काढण्यात येणार आहे. वसंतराव नाईक यांच्या जन्मस्थळ गहुली, महाराष्ट्र ते लकीशाह बंजारा यांचं जन्मस्थळ दिल्लीपर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार आहे. वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी सरकारकडे करत आहोत. अमित शाह यांना भेटून समाजाचे प्रश्न मांडणार आहोत, असेही राठोड पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.