Politics : 'गुजरातच्या पंतप्रधानांमुळे' भारताचे नुकसान; कुणी साधला निशाणा?

Prakash ambedkar : नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर झाली आहे. या युतीच्या नांदेडमधील सभेत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
narendra modi news
narendra modisaam tv
Published On
Summary

नांदेडमध्ये वंचित–काँग्रेस युतीची घोषणा झालीये

बाळासाहेब आंबेडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय

अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेवरून केंद्र सरकारवर टीका केलीये

नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या नव्या युतीचे घोषणा झाली. युतीच्या जाहीर सभेत माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बाळासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून टीका केली. आंबेडकर म्हणाले की, 'देशाच्या संपत्तीतून होणारा नफा भारताच्या तिजोरीत जात नाहीये, तर 'रिलायन्स'कडे जातोय. प्रधानमंत्री जरी देशाचे असले तरी त्यांचा आत्मा गुजरातमध्ये अडकलाय. मोदींचे शरीर देशभर फिरते. मोदी केवळ गुजरातला काय नेता येईल यासाठीच फिरत असतात. त्यांना मी देशाचा नव्हे तर 'गुजरातचा प्रधानमंत्री' म्हणतो'.

narendra modi news
शाळेत अत्यंत हुशार, शिक्षकांच्या लाडकीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह; लातूरमध्ये खळबळ

सीमेवरील परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकरांनी भाष्य केलं. 'युद्धाचा निर्णय पंतप्रधान आणि कॅबिनेटचा असतो, पण युद्ध कसे लढायचे हे लष्कराचे काम असते. स्वतःला 'विश्वगुरू' समजणाऱ्यांना वाटते की युद्धाचेही गुरू आहोत. त्यांच्या याच वृत्तीमुळे पहिल्या दिवशी युद्धाने जे भारताचे नुकसान झालंय. त्याची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली.

narendra modi news
महिला IAS अधिकाऱ्याच्या घरात देहविक्रीचं रॅकेट; ४ तरुणींसोबत ५ तरुण आढळले नको त्या अवस्थेत

'नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देण्यासाठी आहे. उपेक्षितांचे प्रतिनिधी महापालिकेत सन्मानाने बसत नाहीत, तोपर्यंत शहराचा खरा विकास होणार नाही," असेही आंबेडकरांनी पुढे सांगितले.

Q

 ‘गुजरातचे पंतप्रधान’ असे का म्हटले?

A

देशाच्या संपत्तीचा लाभ देशाला न होता काही खासगी उद्योगांना होतोय, असा आरोप करत आंबेडकरांनी मोदींना ‘गुजरातचा पंतप्रधान’ म्हणत टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com