शाळेत अत्यंत हुशार, शिक्षकांच्या लाडकीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह; लातूरमध्ये खळबळ

latur crime news : लातूरमधील शिक्षकांच्या लाडकीचा हॉस्टेलमध्ये मृतदेह आढळला. विद्यार्थिनीच्या आत्महत्येने शाळेत खळबळ उडाली आहे.
latur news update
latur news Saam tv
Published On
Summary

लातूरमध्ये घडली धक्कादायक घटना

सहावीतील विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

विद्यार्थिनीने आयुष्य संपवल्याने परिसरात खळबळ

संदिप भोसले, साम टीव्ही

लातूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लातूरमधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिचा मृतदेह विद्यालयाच्या वसतिगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अनुष्काच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

अत्यंत हुशार विद्यार्थिनीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांसह लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. अनुष्काराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण समोर येईल.

एमआयडीसी पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. तर दुसरीकडे नवोदय विद्यालय परिसरात पालकांनी विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या तक्रारी केल्याने तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

latur news update
निवडणूक होताच काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात लेकीची हत्या करून आईने आयुष्य संपवलं

लेकीच्या आजाराला कंटाळून तिची हत्या करून आईने आयुष्य संपवल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील पुन्हगीळ वारजे भागात ही घटना घडली. छाया आदिनाथ देवडकर असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. शारवी आदिनाथ देवडकर असे लेकीचे नाव आहे. पोलिस या घटनेने परिसरात खळबळ उडालीये.

latur news update
माझ्या पप्पाला आणून द्या, बाळासाहेबांच्या लेकीने टाहो फोडला, अमित ठाकरेही रडले

आदिनाथ देवडकर यांच्या पत्नी छाया आणि मुलगी शारवी असे पुण्यातील गोकुळनगर पठार भागातील रहिवासी होते. शारवीला अस्थिविकार असल्याचे निदान झाले होते. गेल्या महिन्यांपासून शारवीला उपचार सुरू होतं. मुलीच्या आजारामुळे छाया नैराश्यात होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com