Badlapur News : धुळवडीचा रंग धुवायला गेला अन् आक्रित घडलं, पाण्यात जाताना पाय घसरला; ११ वर्षीय लेकाचा बापासमोर अंत

Ulhas River 11 Year Old Boy Drown : हर्ष आनंद चौहान असं मयत मुलाचं नाव असून तो उल्हासनगर कॅम्प ५ मधील प्रेम नगर टेकडी येथील रहिवासी आहे. बदलापुरात उल्हास नदीत बुडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ५वर पोहोचलीय.
Ulhas River 11 year old boy drowns
Ulhas River 11 year old boy drownsSaam Tv News
Published On

ठाणे : बदलापूरच्या उल्हास नदीत एका ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला हा तरुण वडिलांसोबत नदीवर आला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला. हर्ष आनंद चौहान असं मयत मुलाचं नाव असून तो उल्हासनगर कॅम्प ५ मधील प्रेम नगर टेकडी येथील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय. या घटनेमुळे बदलापुरात उल्हास नदीत बुडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ५वर आलीय.

आधी चार जणांचा उल्हास नदीत मृत्यू

बदलापुरातही धुळवड सणाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. बदलापुरातील अनेक सोसायट्यांमध्ये नागरिक मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करताना दिसत आहेत. याच धुळवडीदरम्यान गालबोट लागणारी घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान दुर्देवी घटना घडली आहे. बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Ulhas River 11 year old boy drowns
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा होणार खांदेपालट? एकनाथ शिंदे-अजित पवार मुख्यमंत्री होणार? कुणी दिली ऑफर?

बदलापुरात धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या मुलांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे. बदलापूरच्या चामटोली परिसरात राहणारे चौघे मुले होते. चारही मुले चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे होते. चौघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Ulhas River 11 year old boy drowns
Satish Bhosale : बीडमध्ये गुन्हेगारीला ऊत, अज्ञातांनी खोक्याचं घर जाळलं; कुणी आणि का लावली आग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com