Badlapur : बदलापुरात रस्त्यांवर लागले अनधिकृत पोस्टर्स; ट्रॅफिक सिग्नलला विळखा, पालिकेचे दुर्लक्ष

Badlapur News : महापालिका किंवा नगरपालिका हद्दीत कोठेही पोस्टर किंवा बॅनर लावायचे झाल्यास त्याची अधिकृत परवानगी घ्यावी लागते. मात्र अनेकजण परवानगी न घेताच खांबांवर पोस्टर- बॅनर लावतात
Badlapur News
Badlapur NewsSaam tv
Published On

मयुरेश कडव 
बदलापूर
: बदलापूर शहरात अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्सचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. या पोस्टरबाजांनी चक्क शहरात नव्याने लावण्यात आलेले सिग्नल्स देखील झाकून टाकले आहेत. असे असताना देखील या अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात पालिका प्रशासन कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटला आहे.

महापालिका किंवा नगरपालिका हद्दीत कोठेही पोस्टर किंवा बॅनर लावायचे झाल्यास त्याची अधिकृत परवानगी घ्यावी लागत असते. मात्र अनेकजण परवानगी न घेताच रस्त्यांवरील खांबांवर पोस्टर- बॅनर लावत असतात. त्यानुसारच बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात जागोजागी अवैध पोस्टर्स आणि बॅनर्स लागले आहेत. मात्र याकडे पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Badlapur News
Maval : युवकाने भावनिक व्हिडीओ करत पाठविला कुटुंबाला; नंतर संपविली जीवनयात्रा

कारवाईचा केवळ दिखावा 

पालिकेच्या पथदिव्यांवरील फ्लेक्सची संख्याही वाढली आहे. या पोस्टरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. यातील बहुतांश पोस्टर्स हे राजकीय पदाधिकाऱ्यांचे आणि व्यावसायिक संस्थांचे आहेत. पालिका प्रशासनाकडून त्या विरोधात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. केवळ थातूरमातूर कारवाई करून दोन- चार पोस्टर्स काढण्याचा दिखावा केला जातो. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पोस्टरबाज नेत्यांचं चांगलंच फावले आहे. 

Badlapur News
Shahapur : आदिवासी बांधवांच्या यातना संपेनात; रस्ता नसल्याने गरोदर महिलेला नेले झोळीत टाकून

गुन्हे दाखल करण्याची मागणी 

शहरातील सिग्नल यंत्रणा असलेल्या खांबावर देखील पोस्टर लावण्यात आले असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे अवैध पोस्टर्स तसच बॅनर तत्काळ काढून टाकावेत आणि शहराचं विद्रूपीकरण थांबवावं. तसेच अवैधरित्या पोस्टर्स, बॅनर लावणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर आणि व्यावसायिक संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com