बदलापूर : क्रिकेट खेळताना मारलेला बॉल आणण्यासाठी गेलेल्या एका मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला. सदर मुलगा ५० टक्के भाजला गेला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महावितरण आणि पालिकेच्या गलथान कारभारामुळे सदरची घटना घडली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बदलापूर (Badlapur News) शहरातील बेलवली परिसरातील नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाजवळ निल नॉर्मन (वय १३) हा सदर घटनेत जखमी झाला आहे. निल हा परिसरातील काही मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. दरम्यान फलंदाजी करणाऱ्या मित्राने मारलेला बॉल जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेतजवळ गेला होता. हा बॉल शेडच्या पत्र्याच्या शेजारी अडकल्याने बॉल आणायला तो गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का (Electric Shock) लागला. यात निल हा ५० टक्के भाजला आहे. सदर घटनेची माहिती परिसरात समजल्यानंतर निलला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारासाठी मदतीची मागणी
डीपी जवळून जाणाऱ्या उघड्या तारा या पत्र्याच्या शेडच्या अगदी जवळून गेल्या आहेत. यामुळे विजेचा धक्का लागल्याचे स्थानिकांनी सांगितलं. महावितरण आणि नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. निलच्या घरची परिस्थिती बेताची असून उपचाराची भरपाई द्यावी, अशी मागणी त्याच्या पालकांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.