Badlapur news : बदलापूर नगरपालिकेत आला अनोळखी पाहुणा; कर्मचाऱ्यांची उडाली दाणादाण , नेमक काय घडलं?

Badlapur news : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इमारतीत मंगळवारी दुपारी एका माकडाने अनपेक्षितपणे प्रवेश केल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अचानक आलेल्या या पाहुण्यामुळे दैनंदिन कामात मग्न असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
monkey enters badlapur municipal corporation
monkey enters badlapur municipal corporation saam tv
Published On: 

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत बदलापूर पूर्वेकडील वर्दळीच्या स्टेशन परिसरात आहे. नेहमी गजबजलेल्या या परिसरातील पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमारास अचानक एक माकड दिसून आले. हे माकड समोर येणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने परिसरात पळापळ आणि भीतीचे वातावरण पसरले.

तिसऱ्या मजल्यावर काही वेळ मुक्तसंचार केल्यानंतर हे माकड जिन्याने चौथ्या मजल्यावर गेले. आणि तिथून जवळच्या झाडांवर उड्या मारत ते बाहेर पळून गेले. माकड निघून गेल्यानंतर कर्मचारी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

शहरी भागात माकडांची वाढती दहशत

बदलापूरपासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोज आणि कोंडेश्वरच्या जंगल परिसरात माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो. मात्र, आता ही माकडे अन्नाच्या शोधात थेट शहरी भागात आणि वर्दळीच्या ठिकाणांवर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com