Mahaganapati Temple: बदलापुरातील ३५० वर्षे जुन्या महागणपती मंदिरचं पेशव्यांशी काय आहे नातं; काय आहे इतिहास?

Ganeshotsav: उद्या १८ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पच्या आगमनासाठी तयारी करत आहेत.
Mahaganapati Temple:
Mahaganapati Temple:Saam Tv

Badlapur Mahaganapati Temple :

उद्या १८ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पच्या आगमनासाठी तयारी करत आहेत. या गणेशोत्सवात बदलापूरमधील ३५० वर्ष जुन्या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ. गणेशोत्सवाच आणि बदलापूरच फार नातं जुनं आहे. बुद्धी क्षेत्र अशी या उपनगराची ओळख आहे. (Latest News )

येथील मूळच्या ‘बदलापूर गावी’मधील जुनं‘महागणपती मंदिर’खूप लोकप्रिय आहे. बदलापूर पश्चिमेला बदलापूर गावाच्या मधोमध महागणपती मंदिर आहे. हे मंदिर जवळपास ३०० ते ३५० वर्षे जुनं असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराच्या स्थापनेनंतरच बदलापुरात सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांची सुरूवात झाल्याचं दिसून येते. बदलापूर या गावाला शिवकाळात एक वेगळी ओळख होती.

बदलापूर गावात छत्रपती शिवाजी महाराज घोडे बदलायचे ही आख्यायिका असल्यानं हे गाव अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरले. परंतु याच आख्यायिकेतून येथील महागणपती मंदिराच्या निर्मिती मागील काही कारणे पुढे आली आहेत. बदलापूर गावात पूर्वी घोड्याच्या पागा असायच्या व तेथूनच हे घोडे बदलले जातं असायचे, त्यामुळे बदलापूर हे नाव या गावाला मिळालंय.

बदलापूरचा हा महागणपती बुध्दी क्षेत्र म्हणून ओळखला जातो,हा नवसाला पावणारा गणपती म्हणून या देवस्थानाची ओळख आहे ज्यांना मूल होत नाही असे नागरिक तिथे येऊन नवस बोलतात आणि तो नवस पूर्ण होतो, असं येथील भाविकांचं म्हणणं आहे. महागणपतीची मूर्ती भीमाशंकर येथून पालखीतून बदलापूर गावात आणल्याचं सांगितले जाते. दरम्यान या मंदिराचं पेशव्यांशी खूप जवळील नातं आहे.

पेशव्यांनी या मंदिराच्या दिवा-बत्तीला दोन होन आणि तीर्थ प्रसादासह अध्यात्मिक कार्यक्रमांसाठी मंदिरास ७ एकर जमीन दिल्याची इतिहासात नोंद आहे. सरकार दरबारी देखील याचा उल्लेख आहे. यासंबंधी देवस्थान समितीकडे त्याची तत्कालिन सनदही उपलब्ध आहे. इतकेच नाही तर मंदिराची देखभाल आणि पूजा-अर्चा करण्यासाठी एका भिक्षुक सुद्धा आणले होते. हे भिक्षुक अलिबाग जवळील चरी गावातील होते. त्यांचे नाव रघुनाथ लवाटे असे होते. त्यांची १० वी पिढी अजूनही गावात आहे.

दरम्यान हे मंदिर आधी लाकडी बांधणीचे होते. एखाद्या कोकणातील घरासारखे हे मंदिर बांधण्यात आले होते. मंदिर कौलारू आणि पूर्वाभिमुख आहे. दीपमाळ आणि दर्शनी दरवाजासह आणि तिन्ही बाजूंनी मंदिराच्या दक्षिणोत्तर भागांना जोडणारा कट्टा येथे होता. मंदिराच्या गाभाऱ्यात दोन-अडीच फूट उंचीची गणपतीची जुनी मूर्ती आहे. ही मूर्ती भीमाशंकर येथून पालखीतून बदलापूर गावात आणण्यात आल्याचं ग्रामस्थांनी सांगतात.

Mahaganapati Temple:
Sonalee kulkarni: सोनालीने साकारला गणपती बाप्पा, 'यंदा गणेशोत्सव भावनिक आणि गणेशमूर्ती खास, म्हणत सांगितलं नेमकं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com