Vishal Gangurde
गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकारांच्या घरी गणरायाचं आगमन होत आहे.
सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या घरातील गणरायाचे फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने फोटो शेअर करत 'यंदाचा गणेशोत्सव खूप भावनिक आहे. यंदाची मूर्ती खूप खास असल्याचं सांगितलं आहे.
सोनालीने देहूवरून आणलेल्या मातीने संत तुकाराम यांच्या रुपातील गणरायाची मूर्ती तयार केली आहे.
सोनाली दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते.
सोनाली कुलकर्णीने शाडूची माती, कागदाचा लगदा,पाणी आणि नैसर्गिक रंग वापरून गणपती बाप्पा साकारला आहे.
सोनाली तिच्या पिंपरी चिंचवड शहरातील तिच्या घरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे.