Nandurbar News : पहिल्याच पावसात सोनपाडा ते पालीपाडा नव्या रस्त्याची झाली चाळण, ग्रामस्थ आक्रमक

औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापुर्वी एक आदेश केला आहे.
Nandurbar News
Nandurbar Newssaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा परिषदे अंतर्गत (30 54 योजनेतून) रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. या कामाविषयी अनेक तक्रारी असून जिल्हा परिषद प्रशासनाचा बांधकाम विभागाने या कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. पहिल्याच पावसात नवापूर तालुक्यातील सोनपाडा ते पालीपाडा दरम्यानचा एक किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे. (Maharashtra News)

Nandurbar News
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

जिल्हा परिषदेने (nandurbar) नवापूर तालुक्यातील सोनपाडा ते पालीपाडा दरम्यान एक किलोमीटर रस्त्याचे काम या योजनेअंतर्गत करण्यात येत होते. हे रस्त्याचे काम पावसात करण्यात आल्याने या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण केले जात आहे. एका दिवसापूर्वीच तयार करण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसात खराब झाा.

Nandurbar News
Akola News : जागे व्हा...जागे व्हा... शिंदे- फडणवीस सरकार जागे व्हा... तेल्हारा तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा ठिय्या

या रस्त्यावरची खडी हाताने निघत आह. संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर योग्य पद्धतीने डांबराचा उपयोग केला नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शांतीलाल वळवी, कैलास वसावे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या (30 54) योजनेतील कामांची चौकशी करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने (aurangabad high court) दिल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी लवकरात लवकर काम करण्याचे प्रयत्न सुरू केला आहे. त्यातून निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे समोर येत असल्याने नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या या कामांवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com