अमर घटारे, अमरावती
Bachchu kadu On Ajit Pawar - Sharad Pawar Meeting Prediction : पुण्यातील अजित पवार भेटीवर स्वतः शरद पवार यांनी राजकीय संभ्रम दूर केला असला तरी, या भेटीबाबत राजकीय वर्तुळात अद्याप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू यांनी या भेटीवरून राजकारणाच्या पुढच्या दिशेबाबत भाकित केलं आहे. शरद पवारही अजित पवारांसोबत येतील आणि महायुती आणखी मजबूत करतील, असं कडू म्हणाले. (Tajya Batmya)
अजित पवार आणि शरद पवार यांच्या पुण्यातील भेटीवरून राजकारण ढवळून निघालं होतं. विरोधी पक्षांकडून त्यावरून वेगवेगळे अर्थ लावण्यात येत होते. मात्र, ही भेट गुप्त नव्हती, असं स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट केलं असून, राजकीय वर्तुळात निर्माण झालेलं संभ्रमाचं वादळ दूर करण्याचा प्रयत्न केला. आता या भेटीवरून बच्चू कडू यांनी वेगळेच समीकरण मांडलं आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच संभ्रमात'
बच्चू कडू म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सध्या संभ्रमात दिसतोय. राष्ट्रवादीत अनिश्चितता आहे. पिक्चरमध्ये कोणी येत नाही. अजितदादा बाहेर पडल्यानंतर जो विरोध व्हायला पाहिजे होता तो दिसत नाही. अजितदादांच्या बॅनरवर पवार साहेबांचे फोटो वापरले जातात. या सगळ्या परिस्थितीमध्ये संभ्रम दिसतोय. त्यामुळे शरद पवार देखील अजितदादांसोबत येऊन महायुती मजबूत करतील.'
'शरद पवारांच्या कृती न समजणाऱ्या आहेत'
अजित पवार-शरद पवार भेटीवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, की 'शरद पवार साहेबांचं बोलणं आणि त्यांची कृती या न समजणाऱ्या गोष्टी आहेत. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाही ते करतात असा राजकीय कारकिर्दीतला अनुभव आहे. त्यामुळे काय समजावं हेच कळत नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.