तिसऱ्या आघाडीला MIM नको; बच्चू कडूंनी त्यामागचं कारणही सांगितलं !

Bachchu Kadu News : आमची लढाई जाती धर्मापलीकडे आहे. MIM ची प्रखरता पचवणं आम्हाला शक्य नाही.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam tv
Published On

Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. आघाडी आणि युतीमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत. त्यातच आता तिसऱ्या आघाडीचा प्रयत्नही केला जातोय. बच्चू कडू यांच्याकडून तिसऱ्या आघाडीची स्थापना कऱण्यात येणार आहे. पण या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडू यांनी एमआयएमला घेणार नसल्याचे सांगितले आहे. बच्चू कडू यांनी त्यामागील कारणही स्पष्टपणे सांगितले आहे.

तिसऱ्या आघाडीला MIM नको

गुरुवारी तिसऱ्या आघाडीसंदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे आणि अन्य नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. तिसरी आघाडीची महाशक्ती निर्माण करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. इतरांची आघाडी आणि युती तर आमची जनतेची शक्ती राहील. MIM अथवा धार्मिक प्रखरता असणाऱ्यांना सोबत घेणार नाही. आमची लढाई जाती धर्मापलीकडे आहे. MIM ची प्रखरता पचवणं आम्हाला शक्य नाही. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.

कांदा निर्यात मूल्यावर काय म्हणाले ?

गेल्या काही काळात कांद्यावर जे निर्णय घेतले त्यामुळे खूप नुकसान झाले. कमी भाव असला त्यावेळेस हस्तक्षेप का केला जात नाही. कांदा उत्पादकांना स्थिर भाव देण्याची गरज असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. ग्राहकाला नाराज करायचे नसेल तर त्याचा मारा कांदा उत्पादकावर का करतात? कांदा उत्पादकावर डाका टाकणे बंद केलं तर तर कांदा उत्पादक सुखी होईल. ही हरामखोरी थांबली पाहिजे. कांद्याचे भाव मातीमोल झाले त्यावेळेस लक्षवेधी का आणत नाही? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

तिसरी आघाडीवर काय म्हणाले ?

तिसरी आघाडी म्हणजे आमची महाशक्ती राहणार आहे. आमची वैचारिक बैठक होईल, ते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सत्ताही विकेंद्रीकरण असले पाहिजे, असे कडू म्हणाले.

महायुतीला प्रस्ताव दिलेला होता त्यात अजून विचार झालेला नाही. त्यांच्याकडून उत्तर येत नाही याचा अर्थ त्यांनाच महायुतीत ठेवायचं नाही, असे बच्चू कडू म्हणाले. आघाडी आणि महायुती या दोघांचे लक्ष मुख्यमंत्री खुर्चीवर आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

मनोज जरांगेंच्या मागण्यावर काय म्हणाले ?

ओबीसीमधील काही जाती आता फक्त १९ किंवा २० टक्के आहेत. बाकी विजे एन टी मध्ये आहेत. मराठ गृहीत म्हणून गेलो तर मोठ्या प्रमाणत संख्या आहे. केंद्रावर ओबीसीला २७ टक्के देण्याचा प्रयत्न झाला तो प्रत्येक राज्यात सम समान असू शकत नाही. केंद्राने व्यवस्थित प्रयत्न केला तर चांगला फायदा होऊ शकतो. ओबीसीला ओपन मधले १० टक्के वाढवून घेतले, मराठ्यांचे ही नुकसान होणार नाही आणि ओबीसी यांचे पण नुकसान होणार नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com