Shocking: मंत्री दादा भुसेंच्या नावाने तरुणाला गंडा, वन विभागात नोकरी देतो म्हणत ५ लाखांना लुबाडलं

Minister Dada Bhuse: मंत्री दादा भुसे यांच्या नावाने तरुणाला ५ लाखांचा गंडा घालण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली. वन विभागात नोकरी लावतो असे आमिष तरुणाला दाखवण्यात आले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Shocking: मंत्री दादा भुसेंच्या नावाने तरुणाला गंडा, वन विभागात नोकरी देतो म्हणत ५ लाखांना लुबाडलं
Minister Dada BhuseSaam tv
Published On

Summary -

  • दादा भुसे यांच्या नावाने वन विभागात नोकरी लावतो असे सांगत तरुणाची मोठी फसवणूक

  • तरुणाला ५ लाखांचा गंडा घालण्यात आला

  • याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

  • आरोपींनी तरुणाला मुंबईत आणून चर्चगेटला सोडून दिलं

वन विभागात नोकरी लावतो असे सांगत एका तरुणाची मोठी फसवणूक करण्यात आली. मंत्री दादा भुसे यांच्या नावाने तब्बल ५ लाखांचा गंडा घालण्यात आला. ७ लाख रुपयांत वन विभागात नोकरी लावून राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ऑफरलेटर देतो, असे आमिष दाखवून तिघांच्या टोळीने या तरुणाची फसवणूक केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सौरभ बालाजी वाघ या तरुणाकडून आरोपीने ५ लाख रुपये घेतले.

Shocking: मंत्री दादा भुसेंच्या नावाने तरुणाला गंडा, वन विभागात नोकरी देतो म्हणत ५ लाखांना लुबाडलं
Sambhajinagar: अतिवृष्टीनं पीक गेलं, मुलीच्या कॉलेजची फी कशी भरायची? हतबल झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

रोहन विनोद जाधव असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. शेतकरी कुटुंबातील सौरभ शिक्षणाच्या खर्चासाठी शहरात एका इव्हेंट कंपनीत नोकरी करतो. मार्च महिन्यात त्याची आरोपी रोहनसोबत ओळख झाली. त्याने वडील विनोद जाधव सरकारी बँकेत व्यवस्थापक असून मंत्र्यांसोबत उठबस असल्याचे सांगितले होते. यासोबतच मामाच्या ओळखीतून वनखात्यात नोकरी लावून देतो असे आमिष सौरभला दाखवले.

Shocking: मंत्री दादा भुसेंच्या नावाने तरुणाला गंडा, वन विभागात नोकरी देतो म्हणत ५ लाखांना लुबाडलं
Sambhajinagar: ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले, पण परत आलेच नाहीत; ४ मुलांचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू

वन विभागात नोकरी मिळवण्यासाठी ७ लाख खर्च लागेल असे आरोपीने सौरभला सांगितले. ९ ऑगस्ट रोजी रोहनने सौरभला नियुक्तीपत्र देण्याचे कारण करून कारने मुंबईला नेत तुला दादा भुसे यांची भेट घालून देतो असे सांगितले. मात्र सौरभला चर्चगेट परिसरातच सोडून तो निघून गेला. सायंकाळी पुन्हा त्याला भेटून आणखी ४० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा सौरभला आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. तो तसाच रेल्वेने परत घरी गेला.

Shocking: मंत्री दादा भुसेंच्या नावाने तरुणाला गंडा, वन विभागात नोकरी देतो म्हणत ५ लाखांना लुबाडलं
Sambhajinagar : आईसाठी दागिने बनविण्यापूर्वीच अनर्थ; भरदिवसा गाडीची डिकी तोडून पावणेतीन लाख लंपास

मे २०२५ मध्ये सौरभने त्याला शिवाजीनगरमध्ये शैक्षणिक कागदपत्रांसह ५० हजार रुपये दिले. त्यावेळी रोहनचा मित्र कार्तिक जाधवही सोबत होता. २१ मे रोजी आरोपी रोहन सौरभच्या मुळ गावी सराटी येथे कुटुंबाला भेटला. तेव्हा त्याने पुन्हा ५० हजार रुपये उकळले. २६ मे रोजी पुन्हा शहरात ७० हजार रुपये घेतले. असे करत आरोपीने सौरभकडून ५ लाख रुपये उकळले. या प्रकरणी सौरभने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. तिन्ही आरोपी फरार आहेत.

Shocking: मंत्री दादा भुसेंच्या नावाने तरुणाला गंडा, वन विभागात नोकरी देतो म्हणत ५ लाखांना लुबाडलं
Sambhajinagar : भररस्त्यात एलपीजी टँकर थांबवून गॅस सिलिंडर रिफिलिंग; वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com