चांगली बातमी! मराठवाड्यातील प्रमुख ११ प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला

धरणात पाण्याची आवक वाढल्याने मराठवाड्यातील सर्व मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पांत 65 टक्के जलसाठा
Aurangabad Dams
Aurangabad DamsSaam Tv
Published On

औरंगाबाद - मागच्या आठवड्यातील पावसामुळे मराठवाड्यातील (Marathwada) प्रमुख 11 प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्याने मराठवाड्यातील सर्व मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पांत 65 टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 19 टक्क्यांनी जास्त पाणी वाढला आहे. धरण क्षेत्र आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाल्यामुळे हे चित्र सध्या दिसत आहे. त्यामध्ये मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेले औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण (Paithan) येथील जायकवाडी धरण 72 टक्क्यांपर्यंत भरले आहे.

हे देखील पाहा -

तर नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी हा प्रकल्प 65 टक्के भरला आहे. मानारमध्ये 100 टक्के जलसाठा सध्या आहे. मागील वर्षी सर्व प्रकल्पात 46 टक्के पाणी होते. जायकवाडी धरणात 35 टक्के पाणी वाढले असून माजलगांव प्रकल्पात 13 टक्के पाणी वाढले आहे, तर अद्यापही निम्न दुधनामध्ये 10 टक्के, सिध्देश्वरमध्ये 14 टक्के पाणी कमी आहे. मांजरा प्रकल्प परतीच्या पावसात ओव्हरफ्लो झाला होता. सध्या त्या प्रकल्पात 16 टक्क्यांनी जास्त पाणी आहे. पैनगंगा प्रकल्पातही 16 टक्के पाणी वाढले आहे.

मानारमध्ये 38 टक्के पाणी वाढले आहे. निम्न तेरणामध्ये 9 तर विष्णुपुरी प्रकल्पात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत 23 टक्के पाणी कमी आहे. सिनाकोळेगांव प्रकल्पात वजा 3 टक्के पाणी मागील वर्षी होते. यावर्षी आजवरच्या पावसात 19 टक्के पाणी आले आहे.

Aurangabad Dams
संतापजनक! पाडळदा येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. आज सकाळी धरणातील पाणीसाठा 72.61 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या 45 हजार 892 क्युसेक इतक्या वेगाने पाणी धरणामध्ये जमा होतंय. धरणात 8 जुलै रोजी 33.87 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यानंतर 10 दिवसात धरणातील पाणीसाठ्यात जवळपास 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आता येणारी आवक आणि पावसाची शक्यता असल्याने धरणाचा पाणीसाठा आठवडाभरात शंभरी गाठेल अशी शक्यता आहे. मागच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, आता त्यात घट झाली असली तरीही आवक चांगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com