औरंगाबाद: मराठीमध्ये एक म्हण आहे,"भजनाला ८ आणि भोजनाला ६०." असाच काहीसा प्रकार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्याबाबत प्रशासनाला आढळून आला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये केवळ नावालाच असलेले व प्रत्यक्षात दररोज मदरशांमध्ये जात शिक्षण घेणारी विद्यार्थी संख्या ताबडतोब कळवण्याचे आदेश औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी एका पत्राद्वारे जिल्हाभरातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी शाळेच्या वेळेमध्ये मदरशांमध्ये जात असल्याचे वास्तवदर्शी धक्कादायक चित्र समोर आले आहे, त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी ३० ऑगस्ट रोजी जिल्हाभरातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र काढत अशी विद्यार्थी संख्या तातडीने कळवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषद (Zila Parishad) शाळांच्या पटावरील अनेक विद्यार्थी शाळेच्या वेळेत मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची उपस्थितीची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटावरील शाळानिहाय किती विद्यार्थी शाळेच्या वेळात मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात ? याची माहिती १ सप्टेंबर रोजी न चुकता विना विलंब सादर करावी, असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातून अशी किती आकडेवारी समोर येऊन या भीषणतेचे वास्तव्य समोर येते हे बघणे उचित ठरेल.
मदरसा म्हटले की, पूर्वीपासून धार्मिक शिक्षण देणारी संस्था अशीच ओळख आहे. मुस्लिम समाजातील मुलांमुलींनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी धार्मिक, पारंपरिक शिक्षणाची ओढ कायम ठेवत आधुनिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना मदरसा म्हणून संबोधले जाते. अरबीचा आग्रह तेथे आहेच, अन्य शिक्षणाचीही आवड निर्माण व्हावी, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जातात. आर्थिक कुवत नसलेल्या गरीब, होतकरू कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदरशात प्राधान्याने प्रवेश दिला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.