काय दारु, काय चकणा, काय ते ५० खोके कसं ओके; युवासेनेचा आमदार शहाजीबापू पाटलांवर हल्लाबोल

आमदार शहाजीबापू पाटील यांना काही दिवसापूर्वी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
shahaji bapu patil
shahaji bapu patilSaam Tv
Published On

पंढरपूर : शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, या बंडात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचाही सहभाग होता. या बंडानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांना काही दिवसापूर्वी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता पंढरपूर येथील युवासेनेने प्रत्युत्तर दिले आहे,

आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्यावर पंढरपूरच्या शिवसेना (ShivSena) पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिले आहे. मागिल काही दिवसापासून आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर टिका करत आहेत. शिवसेना पदाधिकारी आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे.

shahaji bapu patil
के. चंद्रशेखर राव यांनी घेतली नितीश कुमारांची भेट; विरोधी पक्षांनी आखली भाजप विरुद्ध नवी रणनीती ?

अलिकडेच आमदार शहाजीबापू पाटील यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत थेट मातोश्रीलाच आव्हान दिले होते. त्यातच आमदार पाटील यांच्याकडून शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर टीका करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काय झाडी, काय डोंगर काय हाटेल.... या डायलॉगमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या आमदार पाटील हे आता शिंदे गटाचे वक्ते म्हणून राज्यभर फिरु लागले आहेत. सभेत बोलताना शिवसेनेवर टिका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. पाटील यांच्या टिकेमुळे दुखावलेले पंढरपुरातील शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी चांगले आक्रमक होत पुढे सरसावले आहेत.

shahaji bapu patil
Asia Cup IND vs HK : भारताचा हाँगकाँगवर दणदणीत विजय; संघ सुपर ४ मध्ये दाखल

युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोल यांनी सोशल मीडियातून आमदार पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा,...काय दारु...काय चकणा.. काय ते ५० खोके समंद कसं ओके.... बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल..आम्ही शिवसैनिक तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वतःच घर पूर्ण करा....स्वतःच्या बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या अशी बोचरी टिका करणाऱ्या पोष्ट सोशल मीडियात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com