Aurangabad ST Bus Fire News : तीन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये खासगी बसला लागलेल्या आगीत होरपळून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, राज्य एसटी महामंडळाच्या बसला आग लागली.
औरंगाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. एसटी बसमधून धूर निघू लागताच, प्रसंगावधान राखून सर्व प्रवासी बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) गंगापूर तालुक्यात सावंगी फाट्याजवळ एसटी बसला आग लागली. ही आग किरकोळ होती. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एसटीतून सुरुवातीला धूर निघू लागला. ते बघून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्व प्रवाशांनी तातडीने बाहेर पडण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Tajya Batmya)
नाशिक खासगी बस दुर्घटनेची पुनरावृत्ती सुदैवाने टळली. सावंगी फाट्याजवळ बस आली असता, बसमधून धूर निघू लागला. हे वेळीच चालक आणि वाहकाच्या लक्षात आले. बसमधून अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये सुरुवातीला घबराट पसरली. पण त्यानंतर त्यांनी तातडीने बसमधून उतरण्यास सुरुवात केली. सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले.
प्रसंगावधान राखून सर्व प्रवासी एसटी बसमधून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जिवीतहानी अथवा कुणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. बसमधील वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मोठी आग लागण्याआधीच बसचालक आणि वाहकाने ही नियंत्रणात आणली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.