Nashik Bus Accident : नाशिक बस दुर्घटनेत जखमी झालेल्याचा रुग्णालयात मृत्यू; कुटुंबावर शाेककळा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपाचार सुरू होते.
Nashik Bus Accident , Akola
Nashik Bus Accident , Akola saam tv

Nashik Bus Accident : नाशिक (Nashik) आठ ऑक्टोबरला झालेल्या एका बस दुर्घटनेत सुमारे १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला हाेता. तसेच या घटनेत तर ३४ जण जखमी झाले होते. या जखमींपैकी अकोला (akola) तालुक्यातील मासा येथील साहेबराव जाधव (५० ) यांचे शुक्रवारी निधन झालं. जाधव हे या अपघातात गंभीर रित्या जखमी झाले होते. (Akola Latest Marathi News)

नाशिक येथील मिरची चौकात आठ ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास बस व कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतला होता. या अपघातात अकोला (akola) तालुक्यातील मासा येथील साहेबराव जाधव हे गंभीर जखमी झाले हाेते. त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात पंधरा दिवसांपासून उपाचार सुरू होते. (Maharashtra News)

Nashik Bus Accident , Akola
Pune Fire News : ऐन दिवाळीत पुण्यातील कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; आगीत चिमुकलीचा हाेरपळून मृत्यू

दरम्यान उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शुक्रवारी जाधव यांची प्राणज्योत मालवली. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना मासा ग्रामपंचायत सदस्य तथा मनसे (mns) उपजिल्हाप्रमुख सतीश फाले यांना दिली. जाधव यांच्या मूळ गावी मासा येथे त्यांच्यावर आज (शनिवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असेही फालेंनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Nashik Bus Accident , Akola
Crime News : ढसाढसा रडत तरुणीने गाठले पाेलिस ठाणे, म्हणाली त्याने माझ्यावर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com