बस अपघातातील जखमींची नावे
अमित कुमार - वय ३४
सचिन जाधव - वय ३०
आश्विनी जाधव - वय २६
अंबादास वाघमारे - वय ४३
राजू रघुनाथ जाधव - वय ३३
निलेश प्रेमसिंग राठोड - वय ३०
भगवान श्रीपत मनोहर - वय ६५
संतोष राठोड - वय २८
हंसराज बागुल - वय ४६
डॉ. गजकुमार बाबुलाल शहा - वय ७९
त्रिशिला शहा - वय ७५
भगवान लक्ष्मण भिसे - वय ५५
रिहाना पठाण - वय ४५
ज्ञानदेव राठोड - वय ३८
निकिता राठोड - वय ३५
अजय देवगण - वय ३३
प्रभादेवी जाधव - वय ५५
गणेश लांडगे - वय १९
पूजा गायकवाड - वय २७
आर्यन गायकवाड - वय ८
इस्माईल शेख - वय ४५
जयनुबी पठाण - वय ६०
पायल शिंदे - वय ९
चेतन मधुकर
महादेव मारुती
मालू चव्हाण - वय २२
अनिल चव्हाण - वय २८
दीपक शेंडे - वय ४०
बस अपघातातील मृत आणि जखमींना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृताच्या वारसाला २ लाख रुपयांची तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल. (Breaking Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर केली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहेत.
अपघात कसा घडला?
शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास औरंगाबाहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस येत होती. त्याचवेळी अमृतधाम चौफुलीकडून टाकळी रोडच्या दिशेने कोळशाने भरलेला आयशर ट्रक भरधाव वेगात येत होता. मिरची हॉटेलसमोरील चौफुलीवर या दोन्ही वाहनांची क्रॉस धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की बसने आयशर ट्रकला सुमारे 500 ते 600 मीटर ढकलत नेलं. बसच्या धडकेत आयशर ट्रकचा डिझेल टॅंक फुटल्याने बसने पेट घेतला. अपघातग्रस्त दोन्ही वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटा हत्ती वाहनावर जाऊन धडकल्या. बस चालक जागेवरच ठार झाला.
बसमधून उड्या घेतल्याने वाचले प्रवासी
पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातावेळी बसमधील बहुतांश प्रवासी पहाटेच्या गाढ झोपेत होते. त्यामुळे अनेकांना आपला जीव वाचवता आला नाही. तर अनेक प्रवाशांनी बसच्या खिडकीतून रस्त्यावर उड्या घेतल्या तर काही प्रवासी हे आगीत होरपळून बाहेर पडले, मात्र त्यांना मदत न मिळाल्याने जागीच गतप्राण झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.