Accident News
Accident NewsSaam tv

Accident: लग्नाच्‍या दीड महिन्यात पती- पत्नीवर काळाचा घाला

लग्नाच्‍या दीड महिन्यात पती- पत्नीवर काळाचा घाला
Published on

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा- पारोळा फाट्यावर भरधाव क्रूजरने मोटरसायकला जोरदार (Accident) धडक दिली. या पती- पत्नीचा जागीच मृत्‍यू (Death) झाल्‍याची धक्कादायक घटना घडली आहे. (Aurangabad Accident News)

Accident News
Jalgaon: अल्‍पवयीन मुलांना लावून दुचाकी चोरी; नऊ दुचाकी हस्‍तगत

सिल्लोड तालुक्यातील (Bodwad) बोदवड येथील रहिवासी असलेले दुर्गाबाई आणि सागर सपकाळ हे पती– पत्‍नी गावाकडे परत जात असताना त्‍यांच्‍यावर काळाने घाला घातला. समोरून भरधाव वेगाने येत असलेल्‍या गाडीने त्‍यांच्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही रस्‍त्‍यावर फेकले गेले.

दीड महिन्‍यापुवीच झाले लग्‍न

सदर अपघातात पतीचा जागेवरच मृत्यू झाला. तर पत्नीचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या लग्नाला अवघा दीड महिना झाला होता. दीड महिन्यातच काळाने घाला घातला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com