H3N2 VIRUS : छत्रपती संभाजीनगरमध्ये H3N2 चे ११ रुग्ण

छत्रपती संभाजीनगरमध्ये H3N2 चे ११ रुग्ण
H3N2 VIRUS
H3N2 VIRUSSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : कोरोना महामारीनंतर देशभरात H3N2 या रुग्णांचे प्रमाण वाढत जात आहे. संपूर्ण देशभरात H3N2 इन्फ्लूएंझाचे हजारो रुग्ण (Corona) आढळले आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्‍ये (Aurangabad) देखील ११ रुग्ण आढळून आल्‍याने प्रशासन अलर्ट झाले आहे. (Letest Marathi News)

H3N2 VIRUS
Dhule News: अल्पवयीन मुलीचा घरी नेत नर्सने केला गर्भपात; एकाला अटक, नर्स मात्र फरार

कोरोना महामारीनंतर आता देशभरात H3N2 या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. संपूर्ण देशभरात H3N2 इन्फ्लूएंझाचे हजारो रुग्ण आढळले आहेत. देशात हा आकडा पुढे आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अनुषंगाने खबरदारीचे पावले उचलली जात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून 'इन्फ्लुएन्झा ए' या विषाणूचा उपप्रकार असलेल्या H3N2 च्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता व्यक्त होत आहे. याच दरम्‍यान छत्रपती संभाजीनगरमध्ये H3N2 चे ११ रुग्ण सापडले आहेत.

महापालिका आरोग्य विभागाकडून खबरदारीचे पाऊल उचलण्यात येत आहेत. H3N2 आजार असलेल्या ११ रुग्णांचे निदान झाल्याचे समोर आले आहे. सध्या रुग्णाची कोरोना, स्वाइन फ्लू आणि H3N2 या तिन्ही तपासण्या होत आहेत. सध्या कोणतीही गंभीर परिस्थिती नव्हती. हा नोटिफायबल आजार असल्याने सर्व खाजगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती कळविण्याची सूचना करण्यात आलेली आहे. संशयीत रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर कोरोना, स्वाइन फ्लू आणि H3N2 ची तपासणी केली जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com