खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्रामपंचायत सदस्स्याची निर्घृण हत्या करण्यात आलीये. रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना या व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. सराईत गुन्हेगारांकडून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
संतोष रामदास दौंडकर (वय ३५) असं ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे. सेझ तालुक्यातील कंपन्यांमध्ये क्रेन पुरवण्याचा दौंडकर यांचा व्यवसाय होता. व्यवसायातिल स्पर्धा आणि वादातून खूनाची घटना घडली असावी अशी गावात चर्चा सुरू आहे.
शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडलीये. संतोष कंपनीच्या गोडाउनजवळ असताना त्याच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी संतोषवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. तो आपल्या बचावाचा प्रयत्न करत असताना हल्लेखोरांनी त्याच्या हातावर वार केला. यात त्याच्या हाताचा पंजा जागीच निखळून पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर सपासप वार केले.
सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आतापर्यंत गावकऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.