Atharva Sudame: पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक अधोगती

From Lokmanya Tilak to Social Media: सोशल मीडियावर अथर्व सुदामेने बनवलेली गणेशोत्सवातील हिंदू-मुस्लीम ऐक्याची रील चांगलीच वादात सापडलीय... त्याचं नेमकं कारण काय? सुदामेच्या रीलमध्ये नेमकं काय आहे? आणि पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक अधोगती कशी सुरु आहे?
Atharva Sudame’s Ganeshotsav reel on Hindu-Muslim unity triggered controversy in Maharashtra, raising concerns about the decline of progressive values.
Atharva Sudame’s Ganeshotsav reel on Hindu-Muslim unity triggered controversy in Maharashtra, raising concerns about the decline of progressive values.Saam Tv
Published On

नमाज अदा करनेवाले हात बाप्पा की मुर्ती सजाऐंगे तो हैरानी तो होंगी ही...शाहू - फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र .असं आपण अभिमानानं सांगत आलो आहोत...मात्र आता काळ बदलत चाललाय..हे सांगायचं कारण म्हणजे समाजमाध्यमावर अथर्व सुदामे या रिल्सस्टारने गणेशोत्सवावर केलेल्या एका रिलवरून पेटलेला वाद

गणेशोत्सवातील हिंदू मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणारी ही गोष्ट हिंदूत्ववादी संघटनांना खटकली...मात्र ही रील पुन्हा पाहा. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला...मात्र त्यांच्याच पुण्यातील सुदामेच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याची रील हिंदूत्ववादी संघटनांना चांगलीच झोंबली.. त्यावरुन हिंदू महासभेच्या आनंद दवेंनी सुदामेवर टीकेची झोड उठवली... तर या टीकेनंतर घाबरगुंडी उडालेल्या सुदामेने थेट आपल्या विचारांवरूनही घुमजाव करत रील डिलीट करुन माफीनामाच जारी केला...

भागवत धर्माची पताका हाती धरणाऱ्या महाराष्ट्राला सहिष्णूतेची आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा आहे..मात्र समाजातल्या जाती धर्माच्या भिंती आता रूंदावू लागल्या आहेत..याआधीही कलाकृतींवर आक्षेप घेतले गेलेत..आणि त्याविरोधात एकत्र येऊन आवाजही उठवला गेलाय. मात्र आपल्या कलाकृतींवर, विचारांवर ठाम राहण्याऐवजी टीकेनंतर माफी मागावीशी वाटत असेल तर ...मग सोशल मिडीयावर मिळणारे व्हूज महत्वाचे की आपल्या विचारांशी बांधिलकी..?.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com